Skip to Content

द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील व्यवस्थापन 

द्राक्षाच्या पीक व्यवस्थापनामध्ये "काडी पक्वता अवस्था" ही अतिशय महत्त्वाची अवस्था आहे.. काडी पक्कता अवस्था हि ८५ ते ११० दरम्यान येते. या कालावधीत पुढील हंगामासाठी निरोगी काडी तयार होणे गरजेचे असते. जर या अवस्थेची योग्य काळजी घेतली नाही, तर उत्पादनावर विपरित परिणाम होतो.

१.बगल फुटी काढणे -

काडीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडणे गरजेचे असते, काडीवर निघालेल्या बगल फुटीमुळे कॅनोपी मध्ये गर्दी वाढते, पाने जुनी होत असताना भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याच नियंत्रणासाठी बागेत निघालेली बगल फूट कमी करणे गरजेचे असते.

२.शेंडा पिंचिंग करणे - बागेमध्ये शेंगा वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते, जोमाने वाढत असलेला नवीन शेंडा खुडावा.

३.काडीच्या तळातील पानें काढणे - डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तळातील दोन ते तीन पाने काढून टाकल्यास ओलांड्यावर आद्रता वाढणार नाही, त्यामुळेच रोगाचे प्रमाण सुद्धा कमी राहण्यास मदत होते.

४.काड्या तारेवर बांधून घेणे - काड्या मोकळ्या करून तारेवर सुतळीने बांधाव्यात.यामुळे कॅनोपी मोकळी राहून हवा खेळती राहते व आद्रतेचे प्रमाण व त्यावर आधारित रोगाचा प्रसार ही कमी राहतो. प्रत्येक काडीवर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे काडीची परिपक्वता लवकर होते.

५.रोग व किड नियंत्रण - बुरशीजन्य रोग (डाऊनी मिल्ड्यू) नियंत्रणासाठी सल्फर/कॉपर आधारित फंगिसाईड्स वापरावीत.

जैविक उपाय: ट्रायकोडर्मा किंवा निंबोळी अर्काचा वापर.

६.संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन - द्राक्ष बागेत वाढ नियंत्रणात ठेवून काडीची परिपक्वता आणण्यासाठी यावेळी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. या अवस्थेत काडीची वाढ गरजेचे नाही, त्यामुळे अतिरिक्त खतांचा वापर कमी करावा. तसेच नत्रयुक्त खते देणे टाळावे. काडीच्या पक्व्तेसाठी फॉस्फोरस, पोटॅश, कॅल्शिअम आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची जास्त आवश्यकता असते. ​

ड्रीप मधून - नोवारेड ४१(०५:०५:४२) + कॅल्शिबोर हि खते १० किलो + १ किलो प्रति एकर प्रमाणे दोन वेळा द्यावीत.

या खतांमुळे काडी परिपकव बनते.

फवारणीतुन - नोवारेड : १ (०५:०५:४२ ) - ५ ग्रॅम + कॅल्शिबोर + सिमॅक्स - १ ग्रॅम प्रति ली प्रमाणे द्यावे.

या खतांमुळे काडी परिपकव बनते. खराब वातावरणात वापरण्यास सुरक्षित.

Note : काडी पक्वता ही द्राक्षाच्या बहर आणि उत्पादनावर थेट परिणाम करणारी अवस्था आहे. या काळात पाणी कमी करणे, नत्र थांबवणे, स्फुरद व पालाश वाढवणे आणि योग्य फवारणी यांचे काटेकोर पालन केल्यास उत्कृष्ट बहर आणि उत्पादन मिळते. .