विद्राव्य खता ची सुरुवात भारतामध्ये महाराष्ट्रात 1994 साली झाली. सुरुवातीच्या काळात ही खते द्रव स्वरूपात येत होती. 1997 पासून ही खते पावडर स्वरूपात उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. या काळात पारंपरिक खतापेक्षा विद्राव्य खताच्या किमती पाच पट जास्त होत्या. तसेच विद्राव्य खता बद्दल अनेक गैरसमज प्रचलित होते. त्यामुळे विद्राव्य खतांचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात होता. ही खते त्यावेळीच्या प्रचलित खत कायद्यामध्ये (फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर ) यामध्येही समाविष्ट नव्हती. यामुळे कोणतेही विद्यापीठ किंवा संशोधन संस्था यांची विद्राव्य व खतांची शिफारस नव्हती. या काळात द्राक्ष डाळिंब केळी या पिकांमध्ये फिल्ड ट्रायल्स घेऊन, तांत्रिक परिसंवाद घेऊन  हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी दोन खाजगी कंपन्यांतील दोन तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 6 लोकांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये मला ही काम करायची संधी मिळाली.  हळूहळू हे तंत्रज्ञान द्राक्ष व डाळिंब बागायतदारांनी अवलंब करण्यास  सुरुवात केली. दरम्यानच्या काळात ड्रीप खालील क्षेत्रात वाढ, द्राक्ष डाळिंब केळी इत्यादी फळांची वाढलेली निर्यात, भाजीपाल्याचे वाढते उत्पादन यामुळे  2010 नंतर विद्राव्य खतांच्या वापरास गती प्राप्त झाली.

 सुरवातीच्या काळामध्ये विद्राव्य खता कडे शेतकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता. विद्राव्य खताच्या वापराचे फायदे जसजसे शेतकऱ्यांना अनुभवास यायला लागले तेव्हापासून विद्राव्य खतांचा वापर वाढू लागला. सद्यस्थितीमध्ये फळबागा व भाजीपाला पिकांमध्ये या खतांचा सर्रास वापर होत आहे. पारंपारिक खताच्या तुलनेत  विद्राव्य खतातून मिळणारे फायदे, पारंपरिक खताच्या वाढलेल्या किमती, शेती उद्योगातील नवीन पिढीची नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची मानसिकता यामुळे  विद्राव्य खतांच्या वापरात गती मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय फळे व भाजीपाला ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारताने ही जागतिक बाजारपेठेत द्राक्ष डाळिंब केळी व भाजीपाला याच्या निर्यातीमध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये द्राक्षातील व डाळिंब पिकातील उद्यमशील शेतकरी त्यांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्था, फळसंशोधन केंद्र यांचा सहभाग खूपच महत्वाचा आहे. परंतु फळे व भाजीपाला च्या  निर्यातीमध्ये अजूनही खूप आव्हाने आहेत. यामध्ये कीटकनाशक रेसिड्यू फ्री व आयातदार देशाच्या क्वालिटी स्टँडर्ड प्रमाणे उत्पादन तयार करण्याचे आव्हान आहे. यासाठी विद्राव्य खताच्या वापराच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांना पिकाला  लागणाऱ्या सोळा अन्नद्रव्याच्या समतोल वापराचा विचार करावा लागेल. दुर्दैवाने हा समतोल वापर सध्या होत नाही त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढत आहे परंतु त्या पटीत शेतकऱ्यांना फायदा राहत नाही. प्रत्येक पिकाची अन्नद्रव्यांची गरज वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळी असते हे जाणून पिकाच्या गरजेनुसार मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे एकत्र मिश्रण असणारी खते तयार केली जातात. यांना कस्टमआईझ फर्टिलायझर्स  ( टेलर मेड ) असे म्हटले जाते. या प्रकारची खते प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. काळाची गरज ओळखून व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मागणीवरून भारतातही केंद्र शासनाने 2017 साली अशा प्रकारच्या खतांच्या निर्मितीस परवानगी दिली आहे. सध्या या प्रकारची खते चार पाच कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध करून देत आहेत. ही सर्व सोळा अन्नघटक समतोल प्रमाणात असणारी 'मायक्रोसिंक टेक्नॉलॉजीवर' आधारित खते शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहेत.
 सर्व कंपन्यांनी खताच्या समतोल वापराचे ज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. सध्याची विद्राव्य खताची भारतीय बाजारपेठ अंदाजे अडीच लाख मेट्रिक टनाची आहे यामध्ये दर वर्षी 10 ते 12 टक्के एवढी वाढ होत आहे. खत व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी महाराष्ट्र हे राज्य सुरुवातीपासूनच  अग्रेसर आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की शेतकऱ्यांनी पिकाला  समतोल अन्नपुरवठा करणाऱ्या, कस्टमाइज्ड ग्रेड या नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक   वापर करावा आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न व दर्जामध्ये निश्चितता आणावी.   

दैनिक ऍग्रो वन मध्ये प्रसिद्ध झालेला लेख ( दिनांक. 7 जून 2021 )
मच्छिन्द्र मगर

Agrinova ची टेलरमेड विद्राव्य खते...... अधिक माहिती साठी (येथे ) क्लीक करा 
MSc (Agri)
चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे काय ? 
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रत्येक कणाभोवती नारळाच्या कवटी सारखे आवरण 
असते यालाच चिलेशन असे म्हणतात या आवरणामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची 
जमिनीत इतर रासायनिक घटकाबरोबर अभिक्रिया होत नाही आणि ते 
कायमस्वरूपी उपलब्ध स्वरूपात राहतात .
◆ मार्केटमध्ये वेगवेगळे चिलेटींग एजंट असणारे सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत यामध्ये इ डी टी ए, इ डी डी एच ए, डी टी पी ए, एच बी इ डी इत्यादी प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत, यातील प्रत्येक चिलेटींग एजंटची कार्यक्षमता ही वेगवेगळी असते. 



◆ याशिवाय partially chelated या प्रकारात काही उत्पादने मार्केट मध्ये उपलब्ध आहेत, परंतु या प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये 6 पी एच च्या पुढे उपलब्ध होत नाहीत.

◆ मार्केटमध्ये Indian व Imported या प्रकारात वेगवेगळे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट उपलब्ध आहेत.
कोणत्या जमिनीच्या परिस्थितीत कोणता चिलेटींग एजंट वापरावा याची माहिती तज्ञाकडून करून घेऊन वापर करावा. 

चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचे फायदे :
• चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना लगेच उपलब्ध होतात.
• चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीत शिल्लक राहिल्यास त्याचे स्थिरीकरण होत नाही. 
• चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना अतिशय कमी प्रमाणात लागतात. 
• चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीच्या वेगवेगळ्या पीएच ला उपलब्ध होतात. 
• चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य यामुळे पिकाची गरज लगेच भरून काढली जाते. 
• खते विद्राव्य असतात किंवा पाण्यामध्ये जलद आणि पूर्णपणे विरघळतात. 
• चिलेट्स स्वरूपातील खतांची कार्यक्षमता जास्त असल्याने खतांचे वापराचे प्रमाण कमी लागते. 
• पिकांचा दर्जा सुधारतो आणि उत्पादन वाढते.


मछिंद्र मगर 
एम. एस. सी.(ॲग्री)



  अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करा.  
 
https://www.nutris.in/product-profile
खतांमधील नत्र ३ स्वरूपात उपलब्ध होते


नायट्रेट नत्र -
या स्वरूपातील नत्र एक तासामधेच उपलब्ध होते.


अमाईड नत्र (युरिया) - या स्वरूपातील नत्र २ ते ३ दिवसांमध्ये उपलब्ध होते.


• अमोनिकल नत्र -
या स्वरूपातील नत्र १५ ते २० दिवसात हळू हळू उपलब्ध होते.


 


टीप :
पिकासाठी नत्र वापरतांना योग्य त्या प्रकारच्या नत्रयुक्त खताची निवड करावी.
 

अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
  
https://www.nutris.in/product-profile