टोमॅटो मधील तिरंगा विकृती : कारणे व उपाय

Tomato Potash Deficiency
■ कमतरतेची लक्षणे :

1. पोटॅश कमतरतेची सुरूवात जून पानापासून होते. सुरवातीला झाडाच्या तळाच्या पानाच्या कडा करपण्यास सुरवात होते. पुढे शिराच्या मधील भाग पिवळा पडतो व नंतर तो करपतो. परंतु पानाच्या शिरा हिरव्या राहतात. पोटॅश दिल्यानंतरही करपलेली पाने दुरुस्त होत नाहीत.

2. पानाच्या कडा curling होण्यास सुरवात होते.

3. फळे उशिरा पक्व होतात, फळांना एकसमान रंग येत नाही यालाच शेतकरी "तिरंगा" असे ही म्हणतात.


4. फळांचे वजन घटते त्यामूळे उत्पन्नात भरीव घट येते.


5. पोटॅश कमतरतेची झाडे रोगास लवकर बळी पडतात आणि रोग नियंत्रण अवघड जाते. 


■ कारणे :

१. पोटॅश युक्त खताचा कमी वापर. 

२. मॅग्नेशिअम किंवा युक्त खताचा जास्त वापर असल्यास पोटॅश चा uptake झाडाकडून कमी होतो.

३. अति थंडी असेल तर, पांढरी मुळी कार्यरत नसेल तर पोटॅश uptake कमी होतो त्यामूळे कमतरता दिसून येते.

४. जमिनीत अविद्राव्य कॅल्शिअम चे प्रमाण जास्त असेल तर.

5. अति कमी किंवा जास्त तापमाणामुळे झाडावर ताण येतो त्यामुळे फळांची एकसारखी पक्वता होतं नाही.

 उपाय :

१. वरील पैकी कमतरतेचे कारण शोधून उपाययोजना करावी

२. ड्रीपमधून नोव्हारेड 5.5.42+ चा तसेच फवारणी तुन 5.5.42 +TE चा वापर गरजेप्रमाणे करावा. 

३. पांढरी मुळी कार्यरत राहाणेसाठी जमीन भसभुसीत राहील याची दक्षता घ्यावी. तसेच मुळीच्या वाढीसाठी सेंद्रिय खते व रॅडिरुट व कार्बोरीच याचा गरजेनुसार वापर करावा.

4. जास्त तापमानामुळे तिरंगा येत असल्यास, तापमानाचा झाडावर होणार स्ट्रेस कमी करणेसाठी सुमोगोल्ड व कॅल्शिबोर ची 15 दिवसातून एक फवारणी करावी.

४. खतांचा असमतोल वापर टाळावा त्यासाठी Schedule चा वापर करावा.

टोमॅटो मधील तिरंगा विकृती : कारणे व उपाय
Machindra Magar 2 May 2021
Share this post
Archive
Sign in to leave a comment


टोमॅटो फवारणी खत व्यवस्थापन
Tomato Spray Fertigation Schedule