द्राक्ष बाग एकसारखी फुटण्यासाठी 5 सूत्रे

बाग एक सारखी फुटली नाही तर काय अडचणी येऊ शकतात?

1. फ्लावरिंग एकावेळी येत नाही

2. शॉर्ट बेरीज व घडामध्ये व्हेरिएशन दिसून येते

3. जिए चे नियोजन करण्यासाठी अडचणी येतात


 बाग जलद व एकसारखे फुटण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:

1. छाटणी अगोदर पाने पडावीत :

   डॉगरीज च्या बागेमध्ये छाटणी अगोदर पाच ते सहा दिवस व ओन रूट च्या बागेमध्ये तीन ते चार दिवस पाने पाडावीत.

पानगळी साठी इथेफॉनचा वापर करू नये
       इथेफॉन हे संजीवक आहे आणि यापूर्वी छाटणीपूर्वी फवारलेल्या इथेफोनचे  रेसिड्यु हार्वेस्टिंग मधील द्राक्षामध्ये आढळून आलेले आहेत
        इथेफॉनचे द्राक्षवेली मध्ये शिल्लक राहिलेले प्रमाण द्राक्षाची कॉलिटी बिघडू शकते. 

       वेलीतील Residual Etheylene मुळे द्राक्ष मण्यांचा Fruit Firmness व Crunchiness -कडकपणा कमी होतो.
www.mdpi.com)

2. पांढरी मुळी ऍक्टिव्ह करावी:

  पांढरी मुळी ऍक्टिव्ह नसेल तर बाग एकसारखी फुटत नाही. पांढरी मुळी ऍक्टिव्ह करण्यासाठी छाटणी अगोदर एक आठवडा दिवस सेंद्रिय खताचा बेसल डोस देतेवेळी जुन्या मुळ्याना इजा करणे आवश्यक आहे. त्याच वेळी एकरी एक किलो ह्युमिक ऍसिड ( रॅडिरूट )ड्रिप मधून द्यावे 


3. खताची योग्य मात्रा द्यावी

  छाटणीच्या दिवशी ड्रिप मधून एकरी पाच किलो 13.00.45 द्यावे.

छाटणीपूर्वी पंधरा दिवस ड्रीपर च्या खाली खड्डा खणून त्यामध्ये१५ ते २० किलो शेणखताचा डोस द्यावा. 
(खड्डा खणताना हलकीशी मुळीला इजा होणे गरजेचे आहे त्यामुळे इजा झालेल्या ठिकाणी पांढऱ्या मुळीची वाढ जलद होते)
सप्टेंबर व आक्टोबर महिन्यातील छाटणीच्या बागांमध्ये बेसल डोस मधून एकरी 15 किलो दाणेदार पोटॅश (Granu-K) Slow Release पोटॅश द्यावे
   ( या काळातील छाटणीच्या बागांना डॉवणी मिलड्यु चा धोका जास्त असतो, पोटॅश वेलींची रोग प्रतिकारशक्ती वाढविते)

 ◆ सप्टेंबर छाटणीच्या बागांमध्ये छाटणीपूर्वी युरिया देऊ नये
      युरीया मुळे सुरवातीच्या अवस्थेत डॉवणी चे नियंत्रण चांगली औषधे वापरूनही अवघड जाईल.

4. जमीन वापसा कंडीशन वर ठेवावी

     छाटणी अगोदर फ्लड पद्धतीने पाणी देऊ नये. जमीन वाफशावर राहील याची काळजी घ्यावी.  


जमीन वाफास्यावर असेल तरच द्राक्षवेलिची मुळी कार्यरत होते, पाणी ज्यास्त झाल्यास मुळी उशिरा कार्यरत होईल व डोळे फुटण्यास उशीर होऊ शकतो.)

5. पेस्ट बेस्ट सर्व डोळ्यांना योग्य पद्धतीने लागेल याची काळजी घ्यावी

   - सरळ गाडी असेल तर शेंड्याच्या चार डोळ्यांना पेस्ट लावावी. सबकेन असेल तर, सबकेन च्या खाली दोन डोळे व सबकेन वरील सर्व डोळ्यांना पेस्ट लावावी.

   - पेस्ट लावल्यानंतर आठ ते दहा तास पाऊस येणार नाही याचा अंदाज घेऊन पेस्ट चे नियोजन करावे.

   - पेस्टमध्ये एक मिली प्रति लिटर एक्टिव्हेटर-१०० वापरावे त्यामुळे पेस्ट सर्व डोळ्यावर एक सारखी पसरते व सक्रिय घटक डोळ्यामध्ये जलद शोषून घेतला जातो.

द्राक्ष बाग एकसारखी फुटण्यासाठी 5 सूत्रे
Machindra Magar 30 September 2022
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


द्राक्ष-एप्रिल छाटणी-2025:फवारणी खत व्यवस्थापन कार्यक्रम
Grape April Pruning Spray Fertigation Schedule (Agrinova)