डाळिंबावरील खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे (शॉट होल बोरर) :
या किडीला ‘पिन होल बोरर’ म्हणून हि संबोधले जाते. बागेभोवती सतत ओलावा तसेच हवेत दमटपणा आणि झाडांची गर्दी जास्त असेल अश्या बागेत या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
ओळख :
या किडींचे भुंगेरे तांबूस काळपट रंगाचे असून आकाराने लहान म्हणजे 2 ते 3 मि.मि. लांबीचे असतात. अळीचा रंग भुरकट पांढरा असतो. या किडींच्या अंडी, अळी, कोष व भुंगेरे या सर्व अवस्था खोडातच आढळून येतात.
नुकसान काय करते ?
भुंगेरे खोडाला सुक्ष्म छिद्रे पाडून आतील भाग पोखरतात. अळी सुध्दा आतील भाग पोखरते. झाडाच्या खोडाच्या खाद्य पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तुटलेल्या असतात. फुलांची सेटिंग होईपर्यंत झाड चांगले दिसते पण फळ लागल्यावर झाड पिवळे पडते. प्रादुर्भाव केलेल्या, जागी टाचणी, सुई आत जाईल एवढे छिद्रा दिसते. या छिद्रांच्या जागी मॅक्रोस्पोरीम अॅम्ब्रोशिया बुरशीची वाढ होते व त्या बुरशीवर हे भुंगेरे उपजिवीका करतात. पोखरलेले झाड पिवळे पडून वाळण्यास सुरूवात होते. प्रादुर्भाव झालेल्या जागी लहान छिद्रांमधून भुसा बाहेर आलेला दिसतो. ही किड जमिनीलगतच्या मुळांवर, खोडावर तसेच फांद्यांवर दिसून येते.
नियंत्रणाकरीता उपाय :
1.बाग स्वच्छ ठेवावी, झाडांची दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी.
2.बागेसभोवती अथवा जवळपास शक्यतो एयंडी लागवड करू नये.
फवारणी :
1. मिओथ्रिन (सुमिटोमो) १५० मिली. प्रति १०० ली. पाण्यातून फवारणी करावी.
2. सायथिऑन (कोरोमंडेल) २०० मिली. प्रति १०० ली. पाण्यातून फवारणी करावी.
पेस्टिंग (खोडाला मुलामा लावणे) : साधारणपणे वर्षातून दोन वेळा जून-जुलै महिन्रात आणि त्यानंतर बहाराचे वेळी खोडाला पेस्ट (मुलामा) लावणे.
पेस्ट तयार करण्याकरिता :
चार किलो गेरू + क्लोरोपायरीफॉस 25 मि.ली अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड १० ली. पाण्यात एकत्र मिसळून तयार झालेली पेस्ट खोडावर 3 ते 4 फुटापर्यंत ब्रशच्या सहाय्याने लावावी.
डाळिंबावरील खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगेरे