द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…
कारणे -
● मागील वर्षी GA, सीपीपीयू व ब्रासिनो स्टेरॉईड अतिवापर.
● मागील सीझनमध्ये प्लॉटमध्ये खूप लोड असणे.
● एप्रिल छाटणी मध्ये 40 ते 100 दिवसाच्या दरम्यान कमी सूर्यप्रकाश.
● घट निर्मितीच्या काळात कॅल्शियम बोरॉन झिंक फॉस्फरस व पोटॅशचा कमी वापर.
● घड निर्मितीच्या काळात पाण्याचा ताण.
● फळ छाटणीनंतर जमिनीत पाण्याचा निचरा नसणे.
● डोळे फुटतेवेळी पांढरी मुळी कार्यरत नसणे.
उपाययोजना -
● छाटणीपूर्वी जमिनीतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
● बाग जलद व एकसारखी फुटण्यासाठी सर्व व्यवस्था करावी.
● तीन पानाच्या अवस्थेत :
● ड्रीपमधून : Novayellow 11.42.11- 10 किलो + कार्बोरिच -1 किलो.
● फवारणी :
1 ली फवारणी - 3 पानाची अवस्था- सिमॅक्स-2 ग्रॅम+झिंकबोर-1 ग्रॅम+05.50.20 -3 ग्रॅम
2 री फवारणी - 15 व्या दिवशी- सिमॅक्स -2 ग्रॅम+झिंकबोर-1 ग्रॅम+05.50.20 - 3 ग्रॅम
● जीए, सीपीपीयू किंवा अमिनो ऍसिड युक्त टॉनिक देऊ नये.
● जीए, सीपीयू किंवा अमिनो एसिड वापरल्यास सिमॅक्स ची फवारणी घेऊ नये.

द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…