Farmers Success Stories

नमस्कार, मी हर्षल पाटील. माझं गाव वाघोदा, तालुका - रावेर, जिल्हा - जळगांव . माझी ६ एकर केळीची बाग आहे. मी गेल्या ६-७ वर्षांपासून केळी ची लागवड करत आहे.
न्यूट्रिस कंपनीचे ऑफिसर शांताराम पाटील हे बागेला भेट द्यायला प्रथमच आले. ऑफिसर नी कंपनी च्या खतांविषयी माहिती दिली. तसेच सोबत एक माहिती पुस्तक दिले. माहिती पुस्तकातील केळी ड्रीप शेड्युल आणि फवारणी शेड्युल प्रमाणे खते वापरण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला मी नोवायलो २१ (११ : ४२ : ११ ) हे खत वापरले. यामुळे झाडाची आणि खोडाची वाढ चांगल्या प्रकारे झाली. सूक्ष्म घडनिर्मिती साठी च्या कालावधीत नोवाग्रीन १२ ( २३ : १५ : १५ ) हे खत वापरले. या खतांमुळे निरोगी घड निर्मिती झाली. घड बाहेर पडण्याच्या कालावधीत नोवाब्लू ३६ ( १६ : ०० : ३२) आणि कॅल्शिबोर ड्रीप, सुमोगोल्ड, हे खत वापरले. या खतांमुळे घड बाहेर पडून केळीच्या वजन वाढीस मदत झाली. केळीच्या पक्वतेच्या अवस्थेत सायटोलिन ड्रीप आणि नोवारेड ४१ ( ०५ : ०५ : ४२ ) हि खते वापरलीत. या खतांमुळे केळीची Quality तसेच फुगवण होऊन केळीचे आकारमान वाढले. आणि उत्पन्नात वाढ झाली. मागील वर्षी पेक्षा या वर्षी अधिक उत्पादन मिळाले. आणि केळी चा संपूर्ण प्लॉट मी विविध शहरांमध्ये एक्स्पोर्ट केला आहे.
कंपनी चे ऑफिसर शांताराम पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. ते वेळो वेळी शेतावर येऊन मार्गदर्शन करत होते, त्यामुळे खते वापरताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या, आणि खते वापरून फरक जाणवला. तसेच वेळोवेळी कंपनीकडून हि मार्गदर्शन मिळाले.
निरोगी आणि दर्जेदार असे उत्पादन केळीचे मला मिळाले. मी न्यूट्रिस कंपनी ची खते वापरून समाधानी आहे...धन्यवाद.
हर्षल पाटील
मोबाइल नंबर - ९६३७३९५७६४
गाव -
वाघोदा,
तालुका -
रावेर,
जिल्हा
-
जळगांव
पीक - केळी

माझे नाव प्रदीप बुरुटे. माझे गाव शेगाव, तालुका जत , जिल्हा सांगली. मी गेल्या ५-६ वर्षांपासून शेती करत आहे. माझी दीड एकर शेत जमीन आहे. त्यापैकी मी ५५ गुंठ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे. याआधी मी भाजीपाला पिके घेत होतो. पण दुष्काळी भाग असल्याने भाजीपाल्यास पुरेसे पाणी मिळत नसल्याकारणाने मिरची पिकाची लागवड केली.
मी १५ फेब्रुवारी २०२१ ला मिरची पिकाची लागवड केली. पण पीक वाढीच्या काळात बऱ्याच समस्या होत्या. वातावरण पोषक नव्हते, ढगाळ वातावरण, अवेळी पाऊस पडणे, गारा पडणे यामुळे फुलगळ, फळ गळीच्या तसेच पिकावर बोकड्या रोग येण्याच्या समस्या होत्या.
माझी ओळख न्यूट्रिस कंपनीचे ऑफिसर मोहिते आणि पाटील सर यांच्याशी होती. नंतर कंपनीचे ऑफिसर सुनील बुधनूर यांच्याशी ओळख झाली. ते शेतावर भेट द्यायला आले. सोबत कंपनीचे माहिती पुस्तक हि दिले. त्यानुसार मी खते वापरलीत.
मिरची पिकाची लागवड करून १० ते १५ दिवस होऊन गेलेले. सुरुवातीला मी नोवाग्रीन ११ (१८ : १८ : १८ ) आणि त्यासोबत कार्बोरिच हे खत वापरले. यामुळे पिकाची शेंडा वाढ होऊन काळोखी चांगल्या प्रकारे आली. फुलधारणेच्या कालावधीत नोवायलो २१ ( ११ : ४२ : ११ ) आणि नोवायलो २२ (१० : ४० : २०) हे खत वापरले. यामुळे फुलधारणा चांगली होऊन फुलगळ नियंत्रण झाले. फळधारणा कालावधीत नोवाब्लू ३४ ( १५ : १० : ३० ) हे खत वापरले. या खतामुळे मिरची फळाची फुगवण होऊन वजन हि वाढले. तसेच कॅलसिबोर ड्रीप आणि कार्बोरिच हि खते पहिल्या तोड्यानंतर वापरली. या खतांमुळे तोड्यानंतर थांबलेला प्लॉट पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. वातावरणातील बदलांमुळे येणाऱ्या समस्या जसे कि फुलगळ, फळगळ, फळाची वाढ न होणे, आणि मिरची पिकावर येणारा चुरडा मुरडा रोग अश्या समस्यांचे निराकरण होऊन उत्कृष्ट असे उत्पादन मला मिळाले. फुलगळ थांबून, फळधारणा चांगली झाली, तसेच फळाचे वजन वाढून उत्पन्नात वाढ झाली. न्यूट्रिस कंपनीचे टॉनिक आणि औषधे कमी किमतीत हि चांगल्या प्रकारे Result देतात याचा मी अनुभव घेतला आहे.
मी शेतकऱ्यांना न्यूट्रिस कंपनी विषयी एवढंच सांगेन कि, कमी किमतीत फायदा जास्त आहे. कमी खर्चात उत्पन्न चांगले मिळते. तसेच कंपनीचे ऑफिसर प्लॉट वरती येऊन वेळो वेळी मार्गदर्शन करतात. पिकाच्या वाढीस पोषक वातावरण नसतानाही मी न्यूट्रिस कंपनीची खते वापरून मिरची पिकाचा प्लॉट Success केला आहे. माझ्यासाठी हा प्लॉट Corona च्या काळात एक वर्गणीच ठरला आहे.... धन्यवाद.
प्रदीप बुरुटे
मोबाइल नंबर - 9767020207
गाव - शेगाव, तालुका - जत, जिल्हा - सांगली.
पीक - मिरची

माझी दोन एकर द्राक्ष बाग आहे. त्यामध्ये मी सुपर सोनाका या जातीची द्राक्ष लागवड केलीली आहे. जमीन मध्यम प्रतीची चांगला निचरा होणारी आहे.
एक दिवस न्यूट्रिस कंपनीचे ऑफिसर विनायक चौंडकर यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडूनच न्यूट्रिस कंपनीच्या खतांविषयी माहिती मिळाली आणि गेल्या ३ वर्षापासून न्यूट्रिस कंपनीची खते वापरत आहे. पण या आधी तर मी पारंपारिक पद्धतीने द्राक्ष बागेचे उत्पादन घेत होतो. सुरुवातीला मी गावातील धनंजय कृषी सेवा केंद्र कलेढोण या कृषी सेवा केंद्रातून काही खते आणली आणि त्यांचा प्रयोग करून पाहिला. result चांगले मिळाले. कमी खर्चात हि उत्पादन चांगले मिळाले. फरक जाणवला खते वापरून त्यामुळे द्राक्ष एप्रिल-ऑक्टोबर छाटणी दरम्यान येणाऱ्या समस्यांचे निराकरण झाले. मग पुढे सर्व खते न्यूट्रिस कंपनीच्या द्राक्ष एप्रिल - ऑक्टोबर छाटणी चार्ट वापरायला सुरुवात केली. तसेच वेळोवेळी कंपनीकडून चांगले मार्गदर्शन ही मिळाले.
न्यूट्रि स कंपनी चे न्यूट्रिस १३ : ०० : ४५, रॅडिरुट, नोवायलो २१ (११ : ४२ : ११ ), नोवायलो २२ ( १० : ४० : २० ), नोवारेड २ ( ०६ : १२ : ३६) , सिमॅक्स , सुमोगोल्ड, झिंकबोर, सायटोलीन ड्रीप अशी न्यूट्रीस कंपनीची खते वापरलित. सोबत काही कीडकनाशके व बुरशीनाशके यांचा वापरही केला. त्यामुळे घडातील मण्यांची निरोगी वाढ झाली आणि न्यूट्रिस कंपनीची खते वापरून उत्पादनातही अधिक वाढ झाली.
द्राक्ष घडातील मण्यांचा आकार वाढला. पूर्वीपेक्षा मला द्राक्ष बागेचे अधिक उत्पादन मिळाल्यामुळे मी न्यूट्रिस च्या उत्पादनाविषयी समाधानी आहे. तसेच इथून पुढील पिकास हि न्यूट्रिस कंपनीची खते वापरणार आहे. न्यूट्रिस कंपनी दर्जेदार खते शेतकऱ्यांना पुरवत आहे. तसेच कंपनी स्वतः कॉल वरती खतांविषयी माहिती देते. कंपनीचे ऑफिसर वेळोवेळी द्राक्ष बागेला भेट देतात. त्यामुळे कोणती खते कधी वापरावीत आणि कशी वापरावीत याची माहिती हि होते.
न्यूट्रिस खतांचा वापर करून द्राक्ष बाग निरोगी व उत्पादनक्षम ठेवून, त्यापासून उत्कृष्ट दर्जेदार माल तयार होतो, याचा मी अनुभव घेतला आहे....
मयूर मोहन निकम
मोबाईल नं . - ९०७५८९९८९२
गाव - कलेढोण , तालुका - खटाव , जिल्हा - सातारा .
पीक - द्राक्षे

मी मागील वर्षांपासून भेंडी लागवड करत आहे. सध्या १६ गुंठ्या मध्ये भेंडी लागवड केलेली आहे. ४ फूट सरीमध्ये २ बियाणे टोकून लागवड केली आहे. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन या वर्षी मिळाले. लागण करून १ महिना होऊन गेलेला. एक दिवस न्यूट्रिस कंपनी चे ऑफिसर सुनील बुधनूर यांची भेट किसान कृषी सेवा केंद्र मध्ये झाली. या ऑफिसर नी न्यूट्रिस कंपनी च्या खतांविषयी माहिती दिली. त्यांना मी माझ्या भेंडी च्या शेतावर बोलवलं. ऑफिसर नि कोणती खते वापरावीत याची माहिती दिली. मी लगेच च किसान कृषी सेवा केंद्र डफळापूर, जत, सांगली या कृषी सेवा केंद्रातून खते आणून वापरायला सुरुवात केली.
भेंडी पिकासाठी रॅडिरुट, कॅलसिबोर ड्रीप, कॅल्शिबोर, कॅर्बोरिच, सुमोगोल्ड, नोवा ग्रीन १२ ( २३ : १५ : १५ ), नोवायलो २१ ( ११ : ४२ : ११ ), नोवरेड ४२ ( ०६ : १२ : ३६ ) हि खते मी वापरलीत. या खतांमुळे फुलधारणा चांगली झाली, तसेच फुलगळ न होता निरोगी फळ तयार झाले. फळांची वाढ हि चांगली झाली. भरगोस असे उत्पादन मागील वर्षी पेक्षा या वर्षी मिळाले.
मी पहिल्यांदाच न्यूट्रिस कंपनी ची खते वापरलीत पण result खूप चांगला मिळाला. १६ गुंठ्यामध्ये ३ टन माल मिळाला. तसेच योग्य वेळी कंपनी च्या ऑफिसर चे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे मी न्यूट्रिस कंपनी ची खते वापरून समाधानी आहे.... धन्यवाद.
संदीप गायकवाड
मोबाईल नं. - ८२०८६२०६८०
गाव - डफळापूर, तालुका - जत, जिल्हा - सांगली
पीक - भेंडी

मी २ एकर मध्ये टोमॅटो लागवड केली आहे. न्यूट्रिस कंपनी चे ऑफिसर किशोर थोरात हे एक दिवस भेट द्यायला आले. त्यांनी कंपनी च्या खतांविषयी माहिती दिली आणि सोबत एक Booklet हि दिले. Booklet मधूनही माहिती मिळाली. आणि ती खते मी कन्नड, औरंगाबाद मधील कृषी सेवा केंद्रातून घेतलीत.
सुरुवातीला मी रॅडिरुट हे खत वापरले. result चांगला मिळाला. नंतर नोवास्प्रे १ आणि २ , नोवाग्रीन १२ ( २३ : १५ :१५ ), नोवायलो २१ - ( ११ : ४१ : ११ ) हि खते पिकाच्या वेगवेगळ्या Stages मध्ये वापरलीत. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळाले.
मी विविध कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरले आहेत, पण result मिळत नव्हता. पण आता टोमॅटोच्या उत्तम आणि निरोगी फळांचे अधिक उत्पादन मिळाल्यामुळे मी न्यूट्रिस कंपनी चे आभार मानतो. आणि मी न्यूट्रिस चे product वापरून समाधानी आहे. माझ्या पुढील पिकास हि न्यूट्रिस कंपनी चे प्रॉडक्ट वापरणार आहे...
स्वप्नील जाधव
मोबाइल नंबर - ९४०५९७६०१२
गाव - माळीवाडा, तालुका - कन्नड, जिल्हा - औरंगाबाद