द्राक्ष एप्रिल/खरड छाटणी नियोजन- 2024

Grape April Pruning Preparation-2024

द्राक्ष एप्रिल/ खरड छाटणी नियोजन- 2022

द्राक्षवेलीच्या काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घड निर्मिती होण्यासाठी एप्रिल किंवा खरड छाटणी करणे महत्त्वाचे असते.

1. छाटणी हार्वेस्टिंग नंतर पंधरा दिवसाची विश्रांती देऊन लगेच घ्यावी. लवकर छाटणी घेतल्यास पावसाळ्यापूर्वी काडी पक्व होऊन निश्चितच सूक्ष्म घड निर्मिती होते.

२ .रूट स्टॉक वरील द्राक्ष वेलीस स्वमुळा वरील द्राक्ष वेलीच्या तुलनेत ३-४ दिवस पाण्याचा ताण द्यावा.

३. खुंटावरील जुन्या द्राक्षबागेत हायड्रोजन सायनाईडचा वापर एकसारखी फुट निघण्याकरिता करावा.

4. बोर्डो मिश्रनाने खोडे धुवून घ्यावीत.

५. ४-५ पानाच्या अवस्थेत अशक्त, डबल येणा-या काड्या काढून प्रति स्क्वेअर फुटास १ ते १.२५ काडी राखावी, म्हणजेच विरळणी करावी.

6. जोमदार वाढीच्या (५ ते ६ पानाच्या) अवस्थेत खालील प्रमाणे फवारणी द्यावी.
    ५ पानावर आल्यानंतर - १ ल्या दिवशी :
    सीसीसी + नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सुपरकॉम्बी
    १०० मिली + ५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

   वरील फवारणीनंतर -३ ऱ्या दिवशी :
   युरॅसिल + नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + झिंकबोर
    १० ग्रॅम. + ५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम

   वरील फवारणीनंतर - ५ व्या दिवशी :
    ६ B.A + नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + कॅलसिबोर
     १.५ ग्रॅम + ५०० ग्रॅम. + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम

७. छाटणीपासून ३० दिवसापर्यंत नत्र व पाणी भरपूर द्यावे व वाढ करून काडी दमदार करून घ्यावी.

8. तास-ए-गणेश व्हरायटीसाठी ५ पानांवर शेंडा खुडून सबकेन तयार करावे व इतर व्हरायटीसाठी सरळ काडी ठेवावी.

९. ४५ ते ६० दिवसांच्या कालावधीत नत्र बंद करावे.

10. 8 ते ९ पानाच्या अवस्थेत खालील प्रमाणे फवारणी द्यावी.
      8 पानावर आल्यानंतर - १ ल्या दिवशी :
      सीसीसी + नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सुपरकॉम्बी
      १०० मिली + ५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

     वरील फवारणीनंतर -३ ऱ्या दिवशी :
     युरॅसिल + नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + झिंकबोर
     १० ग्रॅम. + ५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम

     वरील फवारणीनंतर - ५ व्या दिवशी :
    ६ B.A + नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + कॅलसिबोर
     १.५ ग्रॅम + ५०० ग्रॅम. + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम


11. 1५ पानाच्या अवस्थेत शेंड्याची पिंचींग करावे. म्हणजे काडी सरळ राहील.

12. .पाऊस जास्त असल्यास किंवा तसे वातावरण जास्त काळ असल्यास ड्रीप मधून व फवारणीतून ००:००:५० द्यावे.

13. .एकसारखी नवीन फुट काढू नये त्यामुळे तयार झालेले अन्नद्रव्य वाया जाते.

14. ६० दिवसातनंतर पालाश देऊन काडी पक्वता करून द्यावी.

15. .कोरडया वातावरणात भूरीचा प्रादुर्भाव फवारणी करून टाळावा.

16. .तयार झालेल्या कड्या तारेवर सुतळीने बांधून घ्याव्यात. त्यामुळे सूर्यप्रकाश एकसारखा पडेल व घडनिर्मिती चांगली होईल.

17. ६० दिवसानंतर पाण्याची मात्रा कमी करावी म्हणजे नवीन फुट जास्त येणार नाही.

18. काडी पक्व झाल्यानंतर व शक्यतोवर बुरशी नाशकांची आणि किडनाशकाची फवारणी संपल्यानंतर पावसाळी व आर्द्रतेच्या वातावरणात व्हर्ट्रीसेलीयम 2-3 फवारण्या कराव्या म्हणजे मिलीबग आटोक्यात राहील. 

टिप:- एक्सपोर्ट प्रकारच्या बागेसाठी सीसीसी वापर करू नये.in  GRAPE / द्राक्षे


द्राक्ष एप्रिल/खरड छाटणी नियोजन- 2024
Miss. Dhanshree Bhandare 20 फ़रवरी 2025
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


द्राक्ष-एप्रिल छाटणी-2024 : ड्रीप खत व्यवस्थापण कार्यक्रम
Grape April Pruning Drip Fertilizer Schedule (Agrinova)